कीड रोगांमुळे धान उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST2020-12-13T04:41:21+5:302020-12-13T04:41:21+5:30

यावर्षी पाऊस पाणी चांगले असल्याने धान पीक जोमात आले होते. मात्र धान पिकावर रोगांचे आक्रमण केल्याने उत्पादनापेक्षा लागवड ...

Decrease in paddy production due to pest diseases | कीड रोगांमुळे धान उत्पादनात घट

कीड रोगांमुळे धान उत्पादनात घट

यावर्षी पाऊस पाणी चांगले असल्याने धान पीक जोमात आले होते. मात्र धान पिकावर रोगांचे आक्रमण केल्याने उत्पादनापेक्षा लागवड खर्च जास्त आला. त्यामुळे आलेल्या उत्पादनात कसे उदरनिर्वाह करावे, चिंतेमध्ये शेतकरी सापडला आहे. या ना त्या कारणाने शेतकरी संकटात सापडत आहे. सरकारी मदत मिळत नसल्याने नाराजी आहे. एक एकरामध्ये चार ते पाच पोती धान होत आहे. काहींना १०-१२ पोती धान झाले. मजुरीमध्ये वाढ झाली. पण, शेतीला लागणारा खर्च जास्त येत आहे. सरासरी चार हजार धानाला भाव मिळणे अपेक्षित होते. पण अडीच हजार भाव देऊन सरकारने थट्टा केली. धान्य उत्पादनात घट झाली असताना अनेक पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

Web Title: Decrease in paddy production due to pest diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.