केरोसीन कोट्यात निम्म्याने घट!

By Admin | Updated: February 3, 2015 22:51 IST2015-02-03T22:51:47+5:302015-02-03T22:51:47+5:30

केंद्र व राज्य शासनाकडून केला जाणाऱ्या केरोसीन पुरवठ्यात कपात झाल्याने जिल्ह्याच्या एकूण पुरवठ्यात तब्बल निम्मी घट झाली आहे. त्यामुळे प्रति लाभार्थी मिळणारा केरोसीन कमी झाला असून ज्यांच्याकडे

Decrease in kerosene quota in half! | केरोसीन कोट्यात निम्म्याने घट!

केरोसीन कोट्यात निम्म्याने घट!

कशी पेटविणार चूल? : शुभ्र शिधापत्रिकाधारक व दोन सिलिंडर असणारे लाभार्थी बाद
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
केंद्र व राज्य शासनाकडून केला जाणाऱ्या केरोसीन पुरवठ्यात कपात झाल्याने जिल्ह्याच्या एकूण पुरवठ्यात तब्बल निम्मी घट झाली आहे. त्यामुळे प्रति लाभार्थी मिळणारा केरोसीन कमी झाला असून ज्यांच्याकडे गॅस नाही, त्यांनी कशी पेटवावी चूल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर शासनाच्या नव्या निर्देशानुसार शुभ्र शिधापत्रिकाधारक व दोन गॅस सिलेंंडर असणारे लाभार्थी केरोसीन वाटपातून बाद झाले आहेत.
केंद्र शासन राज्याला केरोसीन पुरवठा करतो. त्यानंतर राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यात केरोसीन वाटप करीत असतो. जिल्हा पुरवठा विभागाने मागणी केलेले नियतन मंजूर करण्याचे काम राज्य शासनाकडून होते. मात्र, नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जिल्ह्याच्या केरोसीन कोट्यात तब्बल निम्मी घट झाली आहे. जिल्ह्याला यापूर्वी १४४४ केएल केरोसीन मिळायचे. मात्र जानेवारी महिन्यात केवळ ६३६ केएल केरोसीन मंजूर झाले आहे. म्हणजे ४०८ केएल केरोसीन कमी झाले असून प्रति शिधापत्रिकाधारकाला मिळणारे केरोसीनही कमी झाले आहे.
यापूर्वी बिगर गॅस शिधापत्रिकाधारकांसाठी महानगर पालिका क्षेत्रात प्रतिव्यक्ती किमान ३ ते कमाल २४ लिटर, तालुका मुख्यालय, नगरपालिका क्षेत्रात प्रतिव्यक्ती किमान २ ते कमाल २० लिटर तर ग्रामीण क्षेत्रात प्रतिव्यक्ती किमान २ ते १५ लिटरचे मासिक केरोसीन निर्धारण वाटप परिमाण होते. तर गॅस धारक ग्राहकांसाठी एक सिलींडर असणाऱ्यास ४ लिटर तर दोन सिलींडर असणाऱ्यांना एकही लिटर केरोसीन दिले जात नव्हते. मात्र, आता शासनाने केरोसीन कोट्यात कपात केल्याने प्रति व्यक्ती मिळणारे केरोसीन आता प्रति शिधापत्रिकाधारकाला मिळत असल्याने सर्वसामान्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

Web Title: Decrease in kerosene quota in half!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.