बल्लारपूर क्षेत्रात गुन्ह्यांच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:12+5:302021-01-13T05:13:12+5:30

बल्लारपूर : सन २०१९ च्या तुलनेत सरत्या २०२० ला, बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मात्र, खुनांची ...

Decline in crime in Ballarpur area | बल्लारपूर क्षेत्रात गुन्ह्यांच्या संख्येत घट

बल्लारपूर क्षेत्रात गुन्ह्यांच्या संख्येत घट

बल्लारपूर : सन २०१९ च्या तुलनेत सरत्या २०२० ला, बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मात्र, खुनांची संख्या वाढली आहे.

२०१९ ला विविध प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या ७९२ होती. २०२० ला ७०८ गुन्हे घडलेत. २०१९ ला खुनांच्या घटना दोन होत्या. २०२० ला एकूण पाच खून झालेत. इतर बऱ्याच गुन्ह्यांचे प्रमाण मात्र घटले आहे. खुनाचा प्रयत्न, जबरी संभोग, जबरी चोरी, दिवसाची घरफोडी, रात्रीची घरफोडी, एकूण चोऱ्या, फसवणूक यांची संख्या २०१९ ला क्रमशः ५,९,६,१२,६५,१० अशी होती. २०२० ला ती क्रमशः १,५,२,१,७,५१,४ अशी राहिली. पळवून नेणे, अनधिकृत गृहप्रवेश, दुखापत, विनयभंग, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला या गुन्ह्यांमध्ये आणखी घट करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी म्हटले आहे.

Web Title: Decline in crime in Ballarpur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.