चंद्रपूरच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:12 PM2019-05-22T23:12:15+5:302019-05-22T23:12:52+5:30

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान झाले. एकूण १९ लाख ४ हजार ३२ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार १०१ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. गुरुवार २३ मे रोजी एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या पटांगणात मतमोजणी होणार आहे.

The decision of the MP of Chandrapur today | चंद्रपूरच्या खासदाराचा आज फैसला

चंद्रपूरच्या खासदाराचा आज फैसला

Next
ठळक मुद्देमतदार राजाचा फायनल कौल कळणार । सकाळी आठपासून सुरू होणार मतमोजणी । कुणाच्या विजयाचा होणार जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान झाले. एकूण १९ लाख ४ हजार ३२ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार १०१ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. गुरुवार २३ मे रोजी एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या पटांगणात मतमोजणी होणार आहे.
सदर मतमोजणी विधानसभानिहाय होणार आहे. प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार असून सहाही विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम निकाल हाती येण्यासाठी कमीत कमी १२ तासांचा अवधी लागणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आधीच स्पष्ट केले आहे. या मतमोजणीसाठी एकूण ३२८ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २५ ते ३० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. एक फेरी ३० ते ४० मिनिटांची असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक असल्याने बुधवारी चंद्रपुरातील गल्लीबोळात निकालाबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. राजकारण, निवडणूक, निकाल हेच आज चर्चेचे विषय होते. चंद्रपूरचा खासदार कोण असेल, याबाबत प्रत्येकाला उत्सुकता लागून आहे. त्यामुळे निकालाच्या प्रत्येक फेरीकडे मतदारांचे लक्ष असणार आहे.
 

Web Title: The decision of the MP of Chandrapur today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.