कापसाच्या चुकाऱ्यांअभावी कर्जदार शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:01 IST2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:01:17+5:30

कापूस विक्रीसाठी ताटकळत राहावे लागत आहे. राजुरा येथे ७ हजार ५०० शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली. पण, खरेदीचा वेग न वाढविल्याने शेतकऱ्यांना खरीप हृंगामाची कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट स्थिती आहे. त्यामुळे सीसीआय शेतकऱ्यांकडून कापूस कधी खरेदी करेल, याची प्रतीक्षा आहे.

Debtor farmers are helpless due to lack of cotton | कापसाच्या चुकाऱ्यांअभावी कर्जदार शेतकरी हतबल

कापसाच्या चुकाऱ्यांअभावी कर्जदार शेतकरी हतबल

ठळक मुद्देपीककर्ज भरण्याची मुदत संपणार : कापूस विक्रीसाठी होतोय विलंब

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : लॉकडाऊनमुळे बहुतांश शेतकऱ्यांचा शेतमाल अजूनही विकला नाही. शेतकºयांना खरीपासाठी पैशाची गरज आहे. पण कापसाचे चुकारे मिळत नसल्याने जुने पीककर्ज परत करून नवीन कर्ज कसे घेणार, याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.
कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाऊन सुरू आहे. शेतकऱ्यांनी कसाबसा शेतातील शेतमाल काढून घरी आणला. मात्र लॉकडाऊनमुळे शेतमालाच्या बाजारपेठावर बंधने आली. नगदी पीक समजला जाणारा कापूस शेतकऱ्यांनी घरीच भरून ठेवला. ३१ मे २०२० पर्यंत पीककर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. परंतु कापूस विक्रीसाठी ताटकळत राहावे लागत आहे. राजुरा येथे ७ हजार ५०० शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली. पण, खरेदीचा वेग न वाढविल्याने शेतकऱ्यांना खरीप हृंगामाची कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट स्थिती आहे. त्यामुळे सीसीआय शेतकऱ्यांकडून कापूस कधी खरेदी करेल, याची प्रतीक्षा आहे. एक महिन्याचा कालावधी उलटला पण ५०० हून जास्त शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली नाही. त्यामुळे राजुरा येथे साडेसात हजार शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी किती दिवसाचा कालावधी लागेल, याचे उत्तर कुणाकडेही नाही. शेतमाल विकला नसल्याने शेतकऱ्यांकडे पीककर्ज भरायला पैसे नाही. बँकांचे पीककर्ज भरण्याची तारीख जवळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

व्याज भरून द्यावे लागणार
यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांना शेतमाल मे महिन्यापर्यंत विक्रीच्या प्रतीक्षेत ठेवावा लागला. त्यामुळे शेतकºयांना पैशाची अडचण निर्माण झाली आहे. शासनाने पीककर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना वर्षभराचे व्याज बँकांना भरावा लागण्याचा धोका आहे.

पीककर्जाला मुदतवाढ द्या
सीसीआयला कापूस विक्री केल्यानंतर महिनाभरानंतर शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे बँक खात्यात वळते केले जाते. ३१ मे २०२० पीककर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना जुने कर्ज भरण्यासाठी शेतकºयांनी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने बँकांचे पीककर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२० पर्यंत करण्याची मागणी आहे.

Web Title: Debtor farmers are helpless due to lack of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस