शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 13:09 IST

पोहनपार येथील शालू मोरेश्वर डोंगरवार (30) या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाली.

चंद्रपूर (ब्रम्हपुरी) : पोहनपार येथील शालू मोरेश्वर डोंगरवार (30) या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाली. पण हा हल्ला नेमका वाघानं केला की बिबट्यानं हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. वनविभागाच्या माहितीनुसार, पोहणपार येथील शालू ग्रामपंचायतच्या मागे शौचास गेली असता बिबट्याच्या हल्ल्या तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. गावातील नागरिक व वनविभागाचे दक्षिण वनपरिक्षेत्राधिकारी जी. आर. नायगमकर यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात नेला.

पोहनपार हे गाव ब्रह्मपुरीपासून सुमारे 25 किमीवर आहे. वाघाच्या बंदोबस्तासाठी 28 नोव्हेंबरला आंदोलन करण्याचा इशारा जि. प. सदस्य राजेश कांबळे यांनी दिला आहे. त्यांनी गावाला भेट दिली. आता ते ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात लवकर पोस्टमार्टेम व्हावे म्हणून आले आहे. मृतक शालूच्या मागे दोन लहान मुले, एक बहीण आणि पती असा परिवार आहे.  तिच कुटुंबाचा आधार होती. घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वनविभाग घटना झालेल्या परिसरात कठडे लावत आहे.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू