ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By Admin | Updated: January 10, 2016 00:53 IST2016-01-10T00:53:50+5:302016-01-10T00:53:50+5:30
गडचांदूर-बिबी मार्गावरील मिश्रा यांच्या शेताजवळ ट्रकने (एमएच ३४-एबी ४१६७) दुचाकी चालकाला धडक दिल्याने दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
गडचांदूर : गडचांदूर-बिबी मार्गावरील मिश्रा यांच्या शेताजवळ ट्रकने (एमएच ३४-एबी ४१६७) दुचाकी चालकाला धडक दिल्याने दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.
आतिश मुर्लीधर शेरे (२४) रा. नांदाफाटा असे मृताचे नाव आहे. मृत आतिश दुकानाचे काम आटोपून नांदाफाट्याकडे यामाहा या दुचाकीने जात होता. विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रकचा उजव्या बाजूचा लाईट बंद असल्यामुळे आतिशने दुचाकी गृहीत धरून आपले वाहन चालविले. ट्रकचा एक लाईट बंद असल्यामुळे हा अपघात घडला. २५ डिसेंबरला आतिशचे साक्षगंध झाले होते. विवाहाची तारीख काढण्याकरिता तो गेला होता. (शहर प्रतिनिधी)