गोजोली आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:48 IST2018-10-24T22:47:29+5:302018-10-24T22:48:01+5:30
गोंडपिपरी येथून सात किमी अंतरावर असलेल्या गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अकस्मात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. भीमराव लालसू गावडे असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कोठी ता. भामरागड येथील रहिवासी आहे.

गोजोली आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
वढोली : गोंडपिपरी येथून सात किमी अंतरावर असलेल्या गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अकस्मात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. भीमराव लालसू गावडे असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कोठी ता. भामरागड येथील रहिवासी आहे.
गोजोली येथे श्रीराम आदिवासी प्राथमिक तथा माध्यमिक विद्यालय असून विविध तालुक्यातील ३६० विद्यार्थी येथे शिकतात. सदर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करण्याकरिता येथील शिक्षक हे गोंडपिपरीपासून १५० कि. मी. अंतरावर असलेले आदिवासीबहुल तालुके भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी येथून विद्यार्थी आणतात. १ ते १० वर्ग असलेल्या या आश्रमशाळेतील भामरागड तालुक्यातील कोठी येथील आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा मंगळवारी शाळेतच आकस्मिक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
मृतक भीमराव गावडे हा दुसऱ्या वर्गात शिकत असून तो हुशार विद्यार्थी होता.
मंगळवारी भीमरावला सर्दी व ताप आल्याची माहिती तेथील मुख्याध्यापक डी. आर. गडेकर यांना मिळाली. लगेचच त्याला शाळेतून गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. दुसºया दिवशी सकाळी ८.३० वाजता शाळेच्या अभ्यास पाळीतसुद्धा भीमराव हा व्यवस्थितपणे अभ्यासाला बसला. काही वेळात अचानक त्याला चक्कर आली व तो खाली पडला. तेथील कर्मचाºयांनी लगेच त्याला गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मंगळवारी भीमरावला अचानक ताप आला व त्याला रुग्णालयातसुद्धा उपचारासाठी नेले होते. दरम्यान, बुधवारी तो शाळेत चक्कर येऊन पडला. परत उपचारासाठी गोंडपिपरीला आणले असता त्याचा दुदैवी मृत्यू झाला. आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांची काळजी घेतच असतो. भीमरावच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही.
-डी. आर. गडेकर, मुख्याध्यापक.