महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:00 AM2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:00:52+5:30

वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना नियमितपणे दर महिन्याला पगार दिला जात नाही. पाच महिन्यांचे पगार थकित असल्याने कामगारांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. अशातच संगिता पाटील यांच्या पतीचेही सहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांना प्रचंड आर्थिक अडचण असल्यामुळे त्या दररोज सहकारी कामगारांना पगाराविषयी विचारणा करीत होत्या.

Death of a female health worker | महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देवेतन नसल्याने होत्या तणावात : कामगारांचा रुग्णालयातच ठिय्या; काम बंद केले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात काम करणाºया संगिता पाटील यांचा मंगळवारी कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागामध्ये भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले. पाच महिन्यांपासून वेतन थकित असल्याने त्या तणावात होत्या. या मानसिक तणावामुळेच त्यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, संगिता पाटील यांच्या मृत्यूने सर्व कामगार संतप्त झाले. त्यांनी रुग्णालयात ठिय्या मांडला.
वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना नियमितपणे दर महिन्याला पगार दिला जात नाही. पाच महिन्यांचे पगार थकित असल्याने कामगारांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. अशातच संगिता पाटील यांच्या पतीचेही सहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांना प्रचंड आर्थिक अडचण असल्यामुळे त्या दररोज सहकारी कामगारांना पगाराविषयी विचारणा करीत होत्या. दरम्यान, मंगळवारी त्यांना कर्तव्यावर असतानाच ह्दयविकाराचा झटका आला. मात्र बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, मृतक महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य करावे, या मागणीसाठी कामगारांनी रुग्णालयातच ठिय्या मांडला. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार, नगरसेवक पप्पू देशमुख, अधिष्ठाता डॉ. सुरपाम यांची अतिदक्षता विभागातील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत मृत महिलेच्या मुलाच्या नावे एक लाख रुपये फिक्स डिपॉझिट जमा करण्यात आले.

Web Title: Death of a female health worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.