उपचाराअभावी इसमाचा मृत्यू

By Admin | Updated: December 17, 2015 00:41 IST2015-12-17T00:41:45+5:302015-12-17T00:41:45+5:30

नवीन बसस्थानकासमोर हुळहुळणाऱ्या अनोळखी व्यक्तीला माजी नगरसेवकाने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Death due to lack of treatment | उपचाराअभावी इसमाचा मृत्यू

उपचाराअभावी इसमाचा मृत्यू

हरविली संवेदना : उपजिल्हा रूग्णालयातील प्रकार
तुमसर : नवीन बसस्थानकासमोर हुळहुळणाऱ्या अनोळखी व्यक्तीला माजी नगरसेवकाने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तासभरानंतरही उपचार न केल्याने अखेर या इसमाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात घडली.
गत दोन ते तीन दिवसांपासून पारा घसरला असून थंडी वाढली आहे. परराज्यातून आलेला हा मनोरुग्ण अंदाजे ४५ ते ५० वर्ष वयोगटातील आहे. हा इसम तुमसर येथील नवीन बसस्थानकावर एक दिवसापूर्वी फिरत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. इकडे तिकडे भीक्षा मागून त्याने पोटाची आग शमविली. परंतु थंडीपासून बचाव करण्याकरिता त्याचेकडे कोणतेही साधन नसल्याने त्या इसमाने अंगावर घातलेला शर्टालाच पांघरून म्हणून ओढले. परंतु कडाक्याच्या थंडीने त्याला झोपू दिले नाही. सकाळ होताच तो इसम कोवळ्या उन्हात येवून झोपला. त्याची प्रकृती खालावली होती. काही संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वप्रथम माजी नगरसेवक बाळा ठाकूर यांना माहिती दिली. त्यांनी त्या इसमाला उठवून त्याला चहा नाश्ता दिला.
परंतु त्याची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून रूग्णवाहिका मागविली. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्या इसमाला रुग्णालयात उपचारासाठी नेले. कर्तव्यावर असलेले डॉक्टरांना त्या इसमाची हकीकत सांगून लवकर उपचार करण्याची विनंती केली. परंतु संवेदना संपलेल्या डॉक्टरांनी कोणतेही प्रतिक्रया न दाखविताना वेळ काढून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान उपचाराला विलंब झाल्याने त्या अज्ञात इसमाचा मृत्यू झाला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Death due to lack of treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.