ब्रह्मपुरीच्या रेल्वे रूळालगत इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: October 17, 2015 01:35 IST2015-10-17T01:35:56+5:302015-10-17T01:35:56+5:30
ब्रह्मपुरी-आरमोरी राज्यमार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळच्या गेटजवळ रेल्वे रुळालगत केवळराम भूर्रे (४५)

ब्रह्मपुरीच्या रेल्वे रूळालगत इसमाचा मृत्यू
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी-आरमोरी राज्यमार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळच्या गेटजवळ रेल्वे रुळालगत केवळराम भूर्रे (४५) रा. पांढरवाणी (ता. अर्जुनी मोर) यांचा मृत्यूदेह आढळला. ही घटना असल्याची गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
केवळराम भूर्रे हे ब्रह्मपुरीला खासगी दवाखान्यात उपचारासाठी आले होते. उपचार घेवून ते ब्रह्मपुरीवरुन अर्जुनी (मोर) ला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोहचले. रेल्वे रूळाला लागूनच पायी पायी जात असताना त्या दरम्यान मालगाडी भरधाव वेगाने गेली. त्यांची प्रकृती बरी नसल्याने याचवेळी ते तोल जाऊन खाली पडले.
त्यात त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मृत्यूदेह तब्बल ३ वाजतापासून पडून होता. मात्र प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्याने त्याकडे फिरकून पाहिले नाही. रेल्वे पोलिसही वेळवर घटनास्थळी पोहचले नाही. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)