येरगव्हाण-सिद्धेश्वर रस्त्यावर जीवघेणे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST2021-07-19T04:18:56+5:302021-07-19T04:18:56+5:30
देवाडा : राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाडा तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या येरगव्हाण-देवाडा-सिद्धेश्वर रस्त्याची दैन्यावस्था झाली आहे. ...

येरगव्हाण-सिद्धेश्वर रस्त्यावर जीवघेणे खड्डे
देवाडा : राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाडा तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या येरगव्हाण-देवाडा-सिद्धेश्वर रस्त्याची दैन्यावस्था झाली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तेलंगणा सीमेलगत असलेले रस्ते खराब झाले आहेत. या भागातील बहुतांश कुटुंब तेलगू भाषिक असल्याने तेलंगणा प्रदेशाशी संपर्क जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे त्यांना तेलंगाणात ये-जा करावी लागते. तेलंगणा प्रदेशाला जोडणाऱ्या या मार्गात महाराष्ट्रातील कोरपना, जिवती व राजुरा तालुक्यातील सोनापूर, भेंडवी, कावळगोंदी, येरगव्हाण, उमरझरा, देवापूर, काकळघाट, भुरकुंडा, पाचगाव, रानवेली, सुकडपल्ली, सोंडो, भेदोडा, मंगी मोर्लीगुडा, गेरेगुडा, लाईनगुडा, सालेगुडा, देवाडा, सिद्धेश्वर, आदी गावे येतात. या मार्गावरून जड वाहतूक सुरू असते. त्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.