आगीत दोन बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

By Admin | Updated: May 14, 2016 00:42 IST2016-05-14T00:42:00+5:302016-05-14T00:42:00+5:30

येथून जवळच असलेल्या शिवरा येथील लक्ष्मण लाकडू नन्नावरे (६५) यांच्या घराला आग लागल्याने दोन बकऱ्या व अन्नधान्यासह

The dead of two goats died in the fire | आगीत दोन बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

आगीत दोन बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

साहित्य जळून खाक : शिवरा येथील घटना
शंकरपूर : येथून जवळच असलेल्या शिवरा येथील लक्ष्मण लाकडू नन्नावरे (६५) यांच्या घराला आग लागल्याने दोन बकऱ्या व अन्नधान्यासह सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.
लक्ष्मण लाकडू नन्नावरे यांचे शिवरा येथे घर आहे. ते शुक्रवारी सकाळी मुलासोबत तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेले होते. त्याच दरम्यान घराला अचानक आग लागली. या आगीत वर्षभरासाठी साठविलेले अन्नधान्य व सर्व साहित्य जळून खाक झाले. घराच्या बाजुने दोन बकरे बांधले होते, त्यांचा सुद्धा होरपळून मृत्यू झाला.
घटनेची माहिती होताच गावातील नागरिक धावून आले. जमेल त्या पद्धतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आले. परंतु, आग विझेपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. (वार्ताहर)

तळोधी : येथील अनिल वसंतराव कोंनमवार यांच्या मालकीच्या गुराच्या गोठ्याला आग लागल्याने गुरांचा चारा जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास गोठ्यातून आगीचे धूळ निघत असल्याचे लक्षात आले. लगेच नागरिकांनी धाव घेऊन विहिरीवरील मोटारपंपाच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मपुरी पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र गोठ्यातील गुरांचा चारा, कवेलू, लाकडी फाटे आदी साहित्य जळून खाक झाले. तहसीलदार समीर माने, मंडळ अधिकारी आर.एस. राऊत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: The dead of two goats died in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.