चंद्रपूरच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात आढळला पट्टेदार वाघिणीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 10:56 IST2018-01-23T10:56:19+5:302018-01-23T10:56:40+5:30
जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बिटात चारगावपासून सुमारे दोन किमी अंतरावर जंगलात मंगळवारी सकाळी एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

चंद्रपूरच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात आढळला पट्टेदार वाघिणीचा मृतदेह
ठळक मुद्देझुंजीत मृत्यू झाल्याचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बिटात चारगावपासून सुमारे दोन किमी अंतरावर जंगलात मंगळवारी सकाळी एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची वरकरणी तपासणी केली असता दोन वाघाच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. मृत वाघिणीचे अंदाजे वय ६-७ असावे. जय वाघाचा मुलगा बिट्टू या परिसरात फिरत असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्राने दिली. दुसऱ्या मृत वाघाची या परिसरात अद्याप नोंद नसल्याची माहितीही वनविभागाच्या सूत्राने दिली.