राजुरा: श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे 'पराक्रम दिवस' निमित्ताने व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ वी जयंती संपूर्ण देशात 'पराक्रम दिवस' म्हणून साजरी होत आहे. त्यानिमित्ताने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे स्मरण व्हावे, यासाठी 'नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानास वक्ता म्हणून प्रा. डॉ. संजय लाटेलवार उपस्थित होते, या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. आर. आर. खेराणी, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी, तर आभार डॉ. सारिका साबळे यांनी मानले.
Web Title: 'Day of Might' by Raseyo Squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.