विविध कार्यक्रमातून सखींनी लुटली बक्षिसांची मेजवानी

By Admin | Updated: May 13, 2016 01:10 IST2016-05-13T01:10:09+5:302016-05-13T01:10:09+5:30

आकर्षक वेशभूषा, केशभूषा, अनुरुप दागिन्यांचा साज, सहावारी- नऊवारी साडीतल्या मराठमोळ्या रुपापासून मारवाडी, ...

Daughters of looted prizes from different programs | विविध कार्यक्रमातून सखींनी लुटली बक्षिसांची मेजवानी

विविध कार्यक्रमातून सखींनी लुटली बक्षिसांची मेजवानी

सखीज् गॉट टॅलेंटला उत्स्फूर्त प्रतिसाद : कलर्स आणि लोकमत सखी मंचचा उपक्रम
चंद्रपूर : आकर्षक वेशभूषा, केशभूषा, अनुरुप दागिन्यांचा साज, सहावारी- नऊवारी साडीतल्या मराठमोळ्या रुपापासून मारवाडी, बॉलिवूड अशा विविध अस्मितेचे प्रतिनिधीत्व करीत सज्ज असलेल्या सख्या, जोशपूर्ण नृत्य, तालासुरात, मंजूळ आवाजात सादर होणारी गाणी, सासू-सुनेचे संबंध, पाणीप्रश्न अशा विविध विषयांसह सादर झालेले अभिनय, सोबत बक्षिसे आणि मनोरंजनाची लयलूट या उत्साही वातावरणात महिलांनी मेजवानीचा आनंद घेतला. निमित्त होते कलर्स वाहिनी आणि लोकमत सखी मंच आयोजित ‘सखीज गॉट टॅलेंट’ कार्यक्रमाचे.
आयएमए हॉल गंजवार्ड चंद्रपूर येथे आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत सखी आपल्या कुटूंबासह सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या अ‍ॅड. संध्या मुसळे तसेच लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर उपस्थित होते. यावेळी सहभागी सखींनी गायन, वादन, नृत्य सादर करून आपल्या प्रतिमेची चुनूक दाखवली.
स्त्रियांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून जसे लोकमत सखी मंच महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीच्या मनात रूजले आहे. तसेच कलर्स चॅनलनेदेखील कौटुंबिक मालिका आणि इतरही कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर स्वतंत्र पकड निर्माण केली आहे. कलर्स चॅनलवर ३० एप्रिलपासून इंडियाज गॉट टॅलेंट दर शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित केले जाते. कलर्स चॅनलने पुन्हा एकदा कलाकारांच्या अंगभुत केलेल्या प्रोत्साहन देण्यासाठी हा मंच कलाकारांना उपलब्ध करून दिला आहे.
‘सिर्फ हुनर ही है पहचान’ याच उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर, प्रसिद्ध निर्देशक करण जोहर, नृत्य निपून मलाईका अरोरा यांच्या अनुभवी परिक्षणातून सर्व कलाकार तावून सलाखून बाहेर निघणार आहेत.
आयएमए हॉल चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात सारेगमपा फेम समृद्धी इंगळे हिने आपल्या सुरेल आवाजात सिनेगीत सादर केले तर श्रुती नगराळे आणि इमरान यांच्या जोडीने नृत्याविष्कार सादर करून धमाल उडवून दिली. परीक्षण संगीत विशारद किशोर तळवेकर आणि नृत्य प्रशिक्षक सागर अंदनकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Daughters of looted prizes from different programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.