पोंभुर्णा शहर काँग्रेस अध्यक्षपदी दत्तू येल्लूरवार, सचिवपदी जयंत टेकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST2021-07-24T04:18:00+5:302021-07-24T04:18:00+5:30
पोंभुर्णा : पोंभुर्णा शहर काँग्रेस कमिटी कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी दत्तू येल्लूरवार, उपाध्यक्षपदी अमोल देवतळे, नरेंद्र गिरसावळे, बंडू ...

पोंभुर्णा शहर काँग्रेस अध्यक्षपदी दत्तू येल्लूरवार, सचिवपदी जयंत टेकाम
पोंभुर्णा : पोंभुर्णा शहर काँग्रेस कमिटी कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी दत्तू येल्लूरवार, उपाध्यक्षपदी अमोल देवतळे, नरेंद्र गिरसावळे, बंडू गुरनुले, कोषाध्यक्षपदी निखिल आरबेडवार, सचिव जयंत टेकाम, सहसचिव रामा कस्तुरे, संघटक सुधीर बल्लावार, शैलेश टेकाम, सहसंघटक सतीश बावणे, अनिल टेकाम, प्रशांत फुलझेले, तर सदस्यपदी सुरज पद्मगिरीवार, अनिल भोयर, दिनेश बुरांडे, कपिल बावणे, कार्तिक सोनुले, विजय बोले, विकास गुरनुले, सचिन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. येथील हिराई रेस्ट हाऊस येथे विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कवडू कुंदावार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ शिंदे, रुषी पोल्लेलवार, सोमेश्वर कुंदोजवार उपस्थित होते.