जीवघेण्या विषारी धुराने दुर्गापुरात काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 23:03 IST2019-01-09T23:03:24+5:302019-01-09T23:03:41+5:30

दुर्गापूर परिसरात स्वयंपाकाकरिता मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाच्या शेगड्या पेटविल्या जात आहेत. यातून सर्वत्र पसरणाऱ्या धुराने आसमंत काळवंडले आहे. त्यात नागरिकांचा जीव घुटमळत असून आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून दुर्गापूर शेगडीमुक्त करणे गरजेचे आहे.

Darkness of the deadly fires, Durgapur, darkness | जीवघेण्या विषारी धुराने दुर्गापुरात काळोख

जीवघेण्या विषारी धुराने दुर्गापुरात काळोख

ठळक मुद्देआजारांचा धोका : उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर : दुर्गापूर परिसरात स्वयंपाकाकरिता मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाच्या शेगड्या पेटविल्या जात आहेत. यातून सर्वत्र पसरणाऱ्या धुराने आसमंत काळवंडले आहे. त्यात नागरिकांचा जीव घुटमळत असून आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून दुर्गापूर शेगडीमुक्त करणे गरजेचे आहे.
शेगड्यांमध्ये दगडी कोळसा जाळून त्यावर स्वयंपाक केला जातो. मात्र त्यातून निघणाऱ्या विषारी धुराचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊन नागरिकांचे आयुर्मान कमी होते. दुर्गापूर परिसरातील काही नागरिक दररोज सकाळी व सायंकाळी दगडी कोळशाच्या शेगड्या पेटवत आहेत. या शेकडो शेगड्यातून धुराच्या स्वरूपात निघणारे विषारी वायु वातावरणात पसरून परिसर काळवंडत आहे.
यामध्ये मनुष्यात घातक असलेला कार्बन मोनाआॅक्साईडचे प्रमाण सर्वाधिक असते. या वायुने दुर्गापूरचा परिसर व्यापून मानवाला आवश्यक असलेला प्राणवायू हरवत आहे.
जीवघेण्या प्रदूषणात नागरिकांचा जीव घुटमळत आहे. या वायुचे रौद्ररूप ताडोबा मार्गावर असलेल्या मेजर स्टोअर गेट ते शक्तीनगर गेटपर्यंतच्या चौफेर भागात अनुभवाला येत आहे. काही दिवसांपासून धुराच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. या प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याने प्रतिबंध घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिक हैराण
दुर्गापूर परिसरात मागील काही दिवसांपासून दिवसभर मोठ्या प्रमाणात धुळीचे कण पसरत आहेत. या भागात स्वयंपाकासाठी कोळशाचा वापर करणाºया नागरिकांची संख्या वाढली. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. पण, या कोळशामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. स्वयंपाकासाठी कोळशाचा नाईलाजास्तव वापर होतो. त्यामुळे अशा कुटुंबीयांना योजनेअंतर्गत सिलिंडर देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: Darkness of the deadly fires, Durgapur, darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.