जिल्ह्यात धान, कापूस पिके धोक्यात

By Admin | Updated: October 18, 2014 23:23 IST2014-10-18T23:23:02+5:302014-10-18T23:23:02+5:30

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कापूस व धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाची हुलकावणी सुरु आहे. शेवटपर्यंत पर्जन्यमान तसेच राहिल्याने जिल्ह्यातील धान

Dangers of paddy and cotton crops in the district | जिल्ह्यात धान, कापूस पिके धोक्यात

जिल्ह्यात धान, कापूस पिके धोक्यात

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कापूस व धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाची हुलकावणी सुरु आहे. शेवटपर्यंत पर्जन्यमान तसेच राहिल्याने जिल्ह्यातील धान व कापूस पीक धोक्यात आली आहेत.
पेरणीनंतर पावसाने दडी मारली. तेव्हा शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न उभा झाला होता. काही दिवस पावसाने हजेरी लावली नाही, तर उभी पिके करपणार, या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली. हवालदिल झालेला शेतकरी पिके वाचविण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करीत रोवणीची कामे केली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे कापूस व धान पिकाला पाण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोंभूर्णा तालुक्यात परिस्थीती बिकट असून पावसाअभावी शेतकरी चिंतातूर आहे. हस्त नक्षत्रात पाऊस पडणार, अशा आशेवर शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती. हस्त नक्षत्र लागून पंधरा दिवस लोटूनही पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतातील उभे पीक करपायला लागले आहेत. काही शेतकरी मोटारपंपाद्वारे शेतातील पिकांना पाणी देत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्यासाठी साधन नाही, त्यांना पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचे धान पिके धोक्यात आली आहेत.
सोयाबीन, कापूसही धोक्यात
चंद्रपूर : मारडा परिसरातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या शेतकऱ्यांचे कामाचे दिवस सुरू आहेत. परंतु, भारनियमनाने शेतकरी त्रस्त झाला आहेत. शेतातील सोयाबीन व कापसाला पाण्याची आवश्यकता आहे. मात्र मारडा परिसरात दिवसाचे भारनियमन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी अडचण येत आहे. सध्या सोयाबीनला शेंगा लागण्याची व कापसाला बोंडे लागण्याची अवस्था आहे.
मागील पंधरा दिवसाअगोदर पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने खत दिले. परंतु तेव्हापासून पाण्याने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Dangers of paddy and cotton crops in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.