डुकरांकडून धान गंजीची नासधूस
By Admin | Updated: December 25, 2016 01:14 IST2016-12-25T01:14:47+5:302016-12-25T01:14:47+5:30
वाकडी (जुनी) परिसरातील शेतकऱ्यांच्या धान गंजीची रानटी डुकरांकडून मोठ्या प्रमाणावर नासधूस होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

डुकरांकडून धान गंजीची नासधूस
चामोर्शी: वाकडी (जुनी) परिसरातील शेतकऱ्यांच्या धान गंजीची रानटी डुकरांकडून मोठ्या प्रमाणावर नासधूस होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
वाकडी येथील शेतकरी निंबाजी परशुराम मिसार यांच्या सर्वे नं. २२६ मधील धान गंजीची सोमवारी रानटी डुकरांकडून नासधूस करण्यात आली. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शेतकरी निंबाजी मिसार यांनी पाच एकरातील धानाच्या भाऱ्यांचे पुंजणे तयार केले होते. काही दिवसात ते धानाची मळणी करण्याच्या आतच रानडुकरांनी धान गंजी उपसून नासधूस केली. यात त्यांचे जवळपास २० पोते धानाचे नुकसान झाले आहेत. यासंदर्भात त्यांनी चामोर्शीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या भागात रानडुकरांनी थैमान घातले असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही मिसार यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)

गडचिरोली तालुक्यातील खुर्सा येथील भगवान मारोती चापले यांच्या पावणे दोन एकरातील तसेच विमलबाई बावणे यांच्या अडीच एकर शेतातील धान पुंजण्याला अज्ञात इसमाने आग लावल्याने पुंजणे जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यामुळे मारोती चापले यांचे ७० हजारांचे तर विमल बावणे यांचे ९० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.