धोक्यात पुन्हा वाढ, बाधितांची संख्या ८६ पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:27 IST2021-03-08T04:27:04+5:302021-03-08T04:27:04+5:30

चंद्रपूर : जिल्हयात कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र काही नागरिक आजही ऐकण्याच्या मनस्थितीत ...

Danger rises again, number of victims crossed 86 | धोक्यात पुन्हा वाढ, बाधितांची संख्या ८६ पार

धोक्यात पुन्हा वाढ, बाधितांची संख्या ८६ पार

चंद्रपूर : जिल्हयात कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र काही नागरिक आजही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रविवारी तब्बल ८६ रुग्णांची वाढ झाली असून सध्या विविध रुग्णांलयांमध्ये ६३२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. विशेष म्हणजे, वरोरा तालुक्यातील रुग्ण संख्या ४० तर चंद्रपूर महापालिका क्षेत्रात १९ नव्याने रुग्णांची भर पडली आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोना संकट पुन्हा तोंड वर काढत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून विविध रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सुविधा अपडेट करणे सुरु केले आहे. जिल्ह्यात वरोरा तालुक्यात सातत्याने रुग्ण संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ तसेच वर्धा जिल्हयात रुग्ण वाढीमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून कोरोनाविषयक नियमांना पाळणे अत्यावश्यक झाले आहे . मागील २४ तासात ४२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर ८६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार २०२ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार १७० झाली आहे. सध्या ६३२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख २२ हजार ५८३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ९६ हजार २४४ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

अशी आहे बेडची संख्या

वनअकादमी ४००

ब्रह्मपुरी सीसीसी १००

डाॅ.पंत हाॅस्पीटल १८

डाॅ. बुक्कावार हाॅस्पीटल ६०

स्वेता हाॅस्पीटल ३०

डाॅ. गुलवाडे हास्पीटल २१

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २४०

क्राईस्ट चॅरिटेबल ट्रस्ट ६०

खिस्तानंद हास्पील ७५

एकूण -१००४

आजपर्यंतचे मृत्यू

चंद्रपूर जिल्हा ३६२

तेलंगणा ०१

बुलडाणा ०१

गडचिरोली १८

यवतमाळ १६

भंडारा ०१

वर्धा ०१

बाक्स

नवे बाधित रुग्ण

चंद्रपूर पालिका क्षेत्र १९

चंद्रपूर तालुका ०२

बल्लारपूर ०३

भद्रावती ०५

ब्रम्हपुरी ०३

सिंदेवाही ०२

मुल १०

राजूरा ०१

वरोरा ४०

इतर ०१

एकूण ८६

--

कोट

कोरोनाचे रूग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा नियमित वापर करावा. वारंवार हात धुवावे.व सुरक्षित अंतर राखावे या त्रिसुत्रीचा वापर करा

अजय गुल्हाने

जिल्हाधिकारी, चंद्रपूर

Web Title: Danger rises again, number of victims crossed 86