सततच्या पावसाने शेतपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:29 IST2021-09-25T04:29:28+5:302021-09-25T04:29:28+5:30

भद्रावती : परतीच्या पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. पीक पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे शेतीचा पंचनामा करून ...

Damage to crops due to continuous rains | सततच्या पावसाने शेतपिकांचे नुकसान

सततच्या पावसाने शेतपिकांचे नुकसान

भद्रावती : परतीच्या पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. पीक पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे शेतीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे रवींद्र शिंदे यांनी केली आहे.

वरोरा-भद्रावती तालुक्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस येत आहे. या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. शेतात पावसाचे पाणी जमा झाले असून, सोयाबीन व इतर पीक पाण्याखाली गेले आहे. पाण्याने सोयाबीन शेंगा खराब झाल्या असून, सडत आहेत. याची प्रत्यक्ष पाहणी प्रशासनाने करावी व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आहे.

240921\img-20210924-wa0037.jpg

परतीच्या पावसाने सोयाबीन व ईतर पिकांचे नुकसान

पंचनामा करुन शेतक-यांना नुकसान भरपाई दया.

Web Title: Damage to crops due to continuous rains