दहेलीवासी व शिक्षकांचा आदर्श घ्यावा - सुधीर मुनगंटीवार

By Admin | Updated: April 21, 2016 01:16 IST2016-04-21T01:16:46+5:302016-04-21T01:16:46+5:30

दहेलीवासीयांनी लोकसहभागातून अवघ्या नऊ महिन्यात शाळेतील इयत्ता एक ते आठच्या सर्व वर्गात डिजीटल ई-लर्निंग केले.

Dahalis and teachers should take the ideal - Sudhir Mungantiwar | दहेलीवासी व शिक्षकांचा आदर्श घ्यावा - सुधीर मुनगंटीवार

दहेलीवासी व शिक्षकांचा आदर्श घ्यावा - सुधीर मुनगंटीवार

बल्लारपूर : दहेलीवासीयांनी लोकसहभागातून अवघ्या नऊ महिन्यात शाळेतील इयत्ता एक ते आठच्या सर्व वर्गात डिजीटल ई-लर्निंग केले. हे लोकशक्तीचे दर्शन आहे. लोकसहभाग हा केवळ शब्द नाही तर देशाच्या विकासाला गती देणारी लोककृती आहे. गाव विकासाच्या व आदर्श गाव निर्मितीच्या या कार्यात तन, मन, धनाने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा परिषद शाळा दहेली जुनी येथे डिजीटल ई-लर्निंग व नवीन वर्ग खोली उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, बाबासाहेब वासाडे, गुरुदेव सेवा मंडळ, रमेश मोहितकर, चंद्रभान वाढई, डॉ. वाढई, आबाजी देरकर, सुरेश निरांजने, गिलोरकर व त्यांची टिम, तरुणांनी व्यसनाधिन होऊ नये, गावातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे याकरीता काम करीत असल्याबद्दल सर्वाचे कौतूक केले. इतरांनीही दहेलीवासी व या शिक्षकांचा आदर्श घ्यावा, असे ते म्हणाले. अर्थसंकल्प शेतकऱ्याला समर्पित केल्याबद्दल ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सरपंच ज्ञानेश्वर टेकाम व उपसरपंच रमेश मोहितकर यांनी सत्कार केला.
याप्रसंगी बाबासाहेब वासाडे, डॉ. अनिल वाढई, डॉ. खुटेमाटे व त्यांचे संचालक मंडळ, नागोबा राजुरकर, दिलीप खाडे व गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य आबाजी देरकर, हरिष ठावरी, विठोबा सोनटक्के, बाबुराव गोरघाटे, शंकर राजुरकर, अजय ठावरी, सुरेश निरांजने आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला एफडीसीएम अध्यक्ष चंदन सिंग चंदेल, जि.प. सदस्य ब्रिजभुषण पाझारे, चौखे, मनपा सदस्य पावडे, दुबे, हरिष शर्मा, विलास बोबडे, एसडीएम निळ, तहसिलदार अहीर, बीडीओ गजभे, हेडाऊ, अयर, भोंड, बंदाली उपस्थित होते. संचालन अल्याडवार यांनी तर आभार पंधरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Dahalis and teachers should take the ideal - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.