सिलिंडरचा ट्रक नदीत कोसळला
By Admin | Updated: June 21, 2017 00:42 IST2017-06-21T00:42:47+5:302017-06-21T00:42:47+5:30
आंध्रप्रदेशकडून सिलिंडर भरुन नेणारा ट्रक पुलावरुन नदीत पडल्याने चालक व वाहकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.

सिलिंडरचा ट्रक नदीत कोसळला
चालक-वाहकाचा मृत्यू
राजुरा : आंध्रप्रदेशकडून सिलिंडर भरुन नेणारा ट्रक पुलावरुन नदीत पडल्याने चालक व वाहकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. ही घटना राजूरा-बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावर सकाळी ७ वाजता सुमारास घडली.
ट्रक चालक किशोर पेंट्या गोपी (३०) व वाहक आनंद अलमदा दोघेही रा. गोपालपूरी जिल्हा गोदावरी असे मृत व्यक्तींचे नाव आहे. ट्रक क्रमांक एपी ३७ टीई ४१५८ राजुरा-बल्लारपूर मार्गाने नागपूरकडे जात होता. नदीपुलावर ट्रक गेल्यानंतर अचानक ट्रक चालकाला झोपेची डुलकी आली. त्यामुळे चालकाचे ट्रकवरुन नियंत्रण सुटले. त्यामुळे पुलावरील कठडे तोडून ट्रक नदीत कोसळला. याची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार मल्लिकार्जून इंगले आपल्या चमूसह घटनास्थळावर दाखल झाले. मात्र त्यावेळी दोघांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे दोघांचाही मृतदेह श्वविच्छेदनासाठी राजूरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते. अतिरिक्त तपास राजुरा पोलीसचे कर्मचारी करीत आहेत.