जनजागृतीसाठी बल्लारपुरात सायकल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST2020-12-31T04:28:20+5:302020-12-31T04:28:20+5:30

माझी वसुंधरा अभियानचा उपक्रम बल्लारपूर : स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत बल्लारपूर नगर परिषदच्या वतीने सायकलस्वार दिन साजरा ...

Cycle march in Ballarpur for public awareness | जनजागृतीसाठी बल्लारपुरात सायकल मार्च

जनजागृतीसाठी बल्लारपुरात सायकल मार्च

माझी वसुंधरा अभियानचा उपक्रम

बल्लारपूर : स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत बल्लारपूर नगर परिषदच्या वतीने सायकलस्वार दिन साजरा करण्यात आला.

यानिमित्त नगर परिषदच्या वतीने शहरातून सायकल फेरी काढण्यात आली. दरम्यान, वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायकल स्वार फेरीत नगराध्यक्ष हरीश शर्मा, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उप मुख्याधिकारी जयवंत काटकर, कार्यालय अधीक्षक संगीता उमरे यांच्या उपस्थितीत शहराच्या विविध भागात फिरून जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात शहरातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. कार्यक्रमात व सायकल फेरीत नगर परिषदचे उपमुख्याधिकारी अभिजित मोटघरे, मंगेश सोनटक्के, सुजित खामनकर, श्याम परसूटकर, राजू बाराहाते, शंकर तांड्रI, शब्बीर अली, शंकर बोज्जा, कर्मवीर सौदागर, अभिजित पांडे, नितीन येनूरकर व समस्त नागिरीकांची उपस्थिती होती.

फोटो : सायकल फेरी अभियानात नगर परिषदचे कर्मचारी

Web Title: Cycle march in Ballarpur for public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.