सूडाच्या भावनेतून रचला होता कट

By Admin | Updated: March 25, 2015 01:32 IST2015-03-25T01:32:44+5:302015-03-25T01:32:44+5:30

येथील कुर्झा मार्गावरील अश्विनी किराणा दुकानात १९ फेब्रुवारीला एका निळ्या रंगाच्या स्पोर्टस बॅगमध्ये एक पाव गांजा व सांबराचे कातडे सापडले.

Cut from the feeling of vengeance | सूडाच्या भावनेतून रचला होता कट

सूडाच्या भावनेतून रचला होता कट

ब्रह्मपुरी : येथील कुर्झा मार्गावरील अश्विनी किराणा दुकानात १९ फेब्रुवारीला एका निळ्या रंगाच्या स्पोर्टस बॅगमध्ये एक पाव गांजा व सांबराचे कातडे सापडले. ही माहिती शहरात पसरताच विविध चर्चांना ऊत आला. ही बॅग कशी, कोठून आणि कुणी ठेवली याचा शोध लावण्याचे वनविभाग व पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मंगळवारी या प्रकरणातील आरोपी महेश तिमाजी देसाई रा. कुर्झा (२५) याला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला.
सुडाच्या भावनेतून हे कट रचल्या गेल्याचे त्याच्या अटकेनंतर सत्य समोर आले. आरोपी महेश हा २०१२ ला एका प्रकरणात ३७६ अन्वये जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. शिक्षा भोगताना कारागृहात मध्यप्रदेशातील एका कैद्याशी त्याची मैत्री झाली. त्याने आपण कोणत्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत आहे, याविषयी सांगितले. त्यानंतर दोघांनीही बदला घेण्यासाठी संगनमत केले. आरोपी महेश हा २१ जानेवारीला सुटून ब्रह्मपुरीला आला. याआधीच तुरुंगातील त्याचा मित्र सुटला होता. दोघेही फोनद्वारे बदला घेण्यासाठी एकमेकांना बाहेर भेटले. यावेळी मध्यप्रदेशातील त्याच्या मित्रांने गांजा व कातडी पुरविल्याचा सत्य बाहेर आले.
महेश देसाई याने १९ फेब्रुवारीला वॉर्डातील एका मित्राची दुचाकी घेऊन महाविद्यालयात जाणाऱ्या मुलाला माझी ही बॅग ‘त्या’ दुकानात (अश्विनी किराणा स्टोअर्स) नेऊन ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या मुलाने ती बॅग त्या दुकानात ठेवून व एखादी वस्तू खरेदी करून निघून गेला. मुलगा व त्याच्यासोबत असलेली मुलगी दोघेही तोंडाला रूमाल बांधले होते. कालांतराने निनावी फोनने वनविभागाला माहिती देण्यात आली. घटनेचा पंचनामा करून खऱ्या आरोपीच्या शोधात वनविभाग व पोलीस असताना पुन्हा त्याच आरोपीने नवीन डाव रचला होता. मात्र डाव फसला. आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Cut from the feeling of vengeance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.