थकबाकीदारांची वीज खुशाल कापा, आधी सूचना तर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:30 IST2021-09-25T04:30:10+5:302021-09-25T04:30:10+5:30

कोविड-१९ कोरोना या महामारीच्या काळामध्ये संपूर्ण भारत बंद असल्यामुळे गरीब जनतेची आर्थिक पिळवणूक झालेली आहे. यात कोणतीही सुधारणा झालेली ...

Cut off the electricity of the arrears, give notice first | थकबाकीदारांची वीज खुशाल कापा, आधी सूचना तर द्या

थकबाकीदारांची वीज खुशाल कापा, आधी सूचना तर द्या

कोविड-१९ कोरोना या महामारीच्या काळामध्ये संपूर्ण भारत बंद असल्यामुळे गरीब जनतेची आर्थिक पिळवणूक झालेली आहे. यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. विद्युत विभागाचीसुद्धा आर्थिक परिस्थिती फार हलाखीची आहे. बरेच लोक बेरोजगार झालेले आहेत, अशा परिस्थितीत काहींनी वीज देयक भरलेले नाही. त्या थकबाकीदारांना कोणतीही सूचना न देता विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जातो. तत्पूर्वी ग्राहकांना तशी नोटीस द्यावी, ही बाब निवेदनात नमूद केली आहे. यावेळी बल्लारपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव देवतळे, शहर अध्यक्ष बादल उराडे, कार्याध्यक्ष राकेश सोमानी, आरिफ खान, महिला शहर अध्यक्ष अर्चना बुटले, कार्यकारी अध्यक्ष शहजादी अन्सारी, महासचिव शुभांगी साठे, संजय अग्रवाल, सुमित डोहणे, अंकित निवलकर, जितेश पिल्ले, निजाम, नितीन सोयाम, रवी बेज्जला, इब्राहिम खान, शाबीर, राजू काब्रा व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

240921\img-20210923-wa0210.jpg

निवेदन देताना राष्ट्रवादी चे कार्यकर्ते

Web Title: Cut off the electricity of the arrears, give notice first