कुंभार व्यवसायाकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:31+5:302021-04-03T04:24:31+5:30

कोरोनोमुळे माठ विक्रेत्यावर आर्थिक संकट पळसगाव (पिपर्डा) :उन्हाळ्याची चाहूल लागताच थंड पाणी पिण्यासाठी गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची ...

Customers turn to pottery business | कुंभार व्यवसायाकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

कुंभार व्यवसायाकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

कोरोनोमुळे माठ विक्रेत्यावर आर्थिक संकट

पळसगाव (पिपर्डा) :उन्हाळ्याची चाहूल लागताच थंड पाणी पिण्यासाठी गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी वाढते. यंदाच्या वर्षी तरी काहीसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र सुरवातीला दिसत होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये माठ खरेदी करण्यास कोणीही येत नसल्याने गरिबांचा फ्रीज ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे.

यावर्षी मार्च महिना संपला तरी पाहिजे त्या प्रमाणात माठ विकले न गेल्याने कुंभार समाज मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

मागील वर्षी उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते आणि कुंभार व्यवसाय अडचणीत सापडला. यावर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीला माठ विक्री सुरू झाली फ्रीज चे पाणी पिण्याचे ऐवजी ग्रामीण भागात माठातील पाण्याला अधिक पसंती देतात. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत असल्याने नागरिक घराबाहेर पडत नसल्याने कुंभार व्यवसाय पुन्हा अडचणीत येतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. माठ तयार करण्यासाठी लागणाऱ्या मातीच्या दरामध्ये यावर्षी वाढ झाली. त्यामुळे यावर्षी माठाच्या किमतीत २० ते ३० रुपयांची वाढ करण्यात आल्याचे कुंभार व्यावसायिकांनी आज पळसगांव येथील आठवडी बाजारमध्ये सांगितले.

बॉक्स

मागील वर्षीही नुकसान

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. व्यवसाय होईल की नाही याची चिंता कुंभार समाजाला आहे. गतवर्षीही कोरोनामुळे माठ विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे, असे रत्नापूर येथील कुंभार व्यावसायिक लक्ष्मण पात्रे यांच्या पत्नीने लोकमतला सांगितले.

Web Title: Customers turn to pottery business