बँक कर्मचाऱ्यांच्या संपाने ग्राहकांची तारांबळ
By Admin | Updated: November 12, 2014 22:40 IST2014-11-12T22:40:34+5:302014-11-12T22:40:34+5:30
गेल्या २४ महिन्यांपासून रखडलेल्या बँक कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, पेन्शन, अनुकंपा तत्वावर नोकरी आदी मागण्यासाठी विविध बँकाच्या कर्मचाऱ्यांनी आज एकदिवसीय संप केला. त्यामुळे ग्राहकांची

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाने ग्राहकांची तारांबळ
चंद्रपूर : गेल्या २४ महिन्यांपासून रखडलेल्या बँक कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, पेन्शन, अनुकंपा तत्वावर नोकरी आदी मागण्यासाठी विविध बँकाच्या कर्मचाऱ्यांनी आज एकदिवसीय संप केला. त्यामुळे ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. एटीएममध्ये पैशाचा ठणठणात होता.
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन या बँक कर्मचारी संघटनेच्या आजच्या संपाला प्रतिसाद देत राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक यातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्ग सहभागी झाले होते. त्याचा परिणाम सर्व बँकिंग उद्योगावर पडला. सकाळी साडे दहाच्या सुमारास सर्व बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी वर्गांनी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर एकत्रीत येऊन सरकारच्या कामगार विरोधी धोरण संदर्भात घोषणाबाजी केली.
त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी बँक आॅफ इंडिया मुख्य शाखेसमोर आपल्या एकतेचे प्रदर्शन घडवत प्रचंड नारेबाजी व धरणे आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व दिनेश मेश्राम, प्रकाश लुतडे, देवीदास नंदनवार, सुनील जामदार, सुनील बेलखोडे, अमृतकर, खलील शेख, मो. बशीर, हवेलीकर, भाग्यश्री फाटक, मानकर आदींनी केले. बॅक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले. नागरिकांची पैसे काढण्यासाठी एटीएमवर गर्दी दिसून आली. मात्र, काही एटीएमवर पैशेच नव्हते. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली. ग्रामीण भागातही हिच परिस्थती दिसून आली.
(स्थानिक प्रतिनिधी)