बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST2020-12-30T04:38:53+5:302020-12-30T04:38:53+5:30

आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण सुरळीत व्हावी यासाठी शासन स्तरावरून कॅशलेस व्यवहारासाठी अनेक उपाययोजना केल्या. याचमाध्यमातून अनेकांनी नेट बँकिंग सारखे व्यवहार ...

Customer contempt from bank employees | बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाची अवहेलना

बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाची अवहेलना

आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण सुरळीत व्हावी यासाठी शासन स्तरावरून कॅशलेस व्यवहारासाठी अनेक उपाययोजना केल्या. याचमाध्यमातून अनेकांनी नेट बँकिंग सारखे व्यवहार करण्यासही सुरुवात केली.गोंडपिपरी येथील अजितकुमार जैन हे प्रतिष्ठित व्यापारी असून ते बँक ऑफ इंडिया शाखा गोंडपिपरी येथून नेहमीच ''''एनईएफटी''''चे व्यवहार करीत राहिले.नेहमीप्रमाणे याच स्वरूपाचे व्यवहार करण्यास जैन बँकेत गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी आमच्या बँकेतून असे व्यवहार होत नसल्यामुळे ज्या बँकेत तुमचे खाते असेल त्याच बँकेतून हे व्यवहार केल्या जात असल्याचे सांगत त्यांच्याशी हुज्जत घातली.सदर व्यापा-याने बँक ऑफ इंडिया शाखा वढोली येथे चालू खाते उघडले आहे. याअगोदर हेच व्यवहार गोंडपिपरी येथूनच रीतसर पार पडत होते मात्र हल्ली कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून बँकिंग व्यवहार करण्यास टाळाटाळ केल्या जात आहे.खाते कुठल्याही शाखेत असले तरी ऑनलाइन व्यवहार गोंडपिपरी बँकेतून झाले असताना आता येथील कर्मचारी कामचुकारपणा करीत नाहक त्रास देत असल्याची माहिती अजितकुमार जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Web Title: Customer contempt from bank employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.