बल्लारपूर नगर परिषदेने तयार केली मुद्रा
By Admin | Updated: March 17, 2017 01:02 IST2017-03-17T01:02:57+5:302017-03-17T01:02:57+5:30
बल्लारपूर नगर परिषद अस्तित्वात येऊन सुमारे ६७ वर्षे झाली आहेत. मात्र, या नगर परिषदेने यादरम्यान आपली स्वत:ची

बल्लारपूर नगर परिषदेने तयार केली मुद्रा
वापर सुरू : ऐतिहासिक उल्लेख
बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषद अस्तित्वात येऊन सुमारे ६७ वर्षे झाली आहेत. मात्र, या नगर परिषदेने यादरम्यान आपली स्वत:ची मुद्रा (लोगो) बनविली नव्हती. ती यावर्षी तयार करुन त्या मुद्रेला नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. ही मुद्रा या नगर परिषदेची आता ओळख ठरणार आहे.
ऐतिहासीक व औद्योगिक शहर अशी बल्लारपूरची सर्वदूर ख्याती आहे. या मुद्रेत येथील ऐतिहासक किल्ल्याचे प्रवेशद्वार, येथे सुमारे ६५० वर्षे राज्य केलेल्या गोंडराजाचे हत्तीवर आरुढ आक्रमक सिंह हे राजचिन्ह, तदवतच बल्लारपूरची अर्थवाहिनी असलेले पेपर मिल, सागवान लाकडांचा डेपो, कोळसा खाण यांच्या ओळख चिन्हांचा यात समावेश असून या नगर परिषदेचे स्थापना वर्ष १९५० याचा ही उल्लेख त्यात केला गेला आहे.
आणि मधोमध बी.एम.सी. अर्थात बल्लारपूर म्युनिसीपल कमेटी असे लिहिले आहे. बल्लारपूर नगर परिषदेची आपली मुद्रा असावी, याकरिता वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी पुढाकार घेतला. त्याप्रमाणे उपमुख्याधिकारी अभिजीत मोटघरे, अभियंता संकेत नंदवंशी, चिचघरे यांनी अभ्यास करुन मुद्रेची संकल्पना तयार केली. याकरिता वसंत खेडेकर आणि श्रीपाद यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)