नांदाफाटा, बाखर्डी येथे सुसंस्कार शिबिर

By Admin | Updated: May 19, 2014 23:25 IST2014-05-19T23:25:44+5:302014-05-19T23:25:44+5:30

कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदाफाटा येथे सुसंस्कार शिबिर सुरू आहे. याच धर्तीवर गडचांदूर, भोयगाव मार्गालगत असलेल्या

Cultural camp at Nandafata, Bakhdari | नांदाफाटा, बाखर्डी येथे सुसंस्कार शिबिर

नांदाफाटा, बाखर्डी येथे सुसंस्कार शिबिर

 लखमापूर : कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदाफाटा येथे सुसंस्कार शिबिर सुरू आहे. याच धर्तीवर गडचांदूर, भोयगाव मार्गालगत असलेल्या बाखर्डी येथेसुद्धा सुसंस्कार शिबिर सरू करण्यात आले आहे. या शिबिरात ३०० विद्यार्थी संस्काराचे धडे घेत आहेत. मागील १५ वर्षांपासून कोरपना तालुक्यात राष्टÑधर्म सेवा समिती व गुरुदेव सेवा मंडळाच्या अंतर्गत हा उपक्रम सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांत विद्यार्थी घरी किंवा इतर गावाला जाऊन दिवस घालवतात. शहरातील विद्यार्थी समर कॅम्पमध्ये जातात. याउलट ग्रामगीतेच्या विचाराने व्यक्तिमत्त्व घडविता यावे व आजच्या बालक उद्याचा आदर्श चालक बनावा, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजक विठ्ठल डाखरे महाराज यांनी सांगितले. शिबिरातून प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी गावागावात जनजागृती करीत असून ग्रामस्वच्छता अभियान राबवित आहे. नांदाफाटा येथे डॉ. देवराव जोगी, विठ्ठल डाखरे महाराज तर, बाखर्डी येथील शिबिरात किन्नाके महाराज, सुरेश चौधरी, रामदास तावाडे आदी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे. विद्यार्थ्यांना विविध जिल्ह्यातून आलेले हनुमान गुरुजी, राजू मेश्राम, ठकसेन पेंदोर, सागर भोंगळे, ह.भ.प. धाबेकर महाराज, नितीन श्रीरामपवार, राजू सोनपिपरे, मास्टर कबीर, प्रकाश मडावी, आकाश मडावी, अनिकेत राजुरकर, धनंजय डाखरे आदी प्रशिक्षण देत आहे. शिबिराला भेटी देण्यासाठी अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी, पालक येत असून पुढील वर्षांची नोंदणी पालक करीत आहे. शिबिरामुळे नांदाफाटा व बाखर्डी गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Cultural camp at Nandafata, Bakhdari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.