कोरोना बाधितांससह सिटी स्कॅन तपासण्या वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:51+5:302021-04-03T04:24:51+5:30

एचआरसीटी चेस्ट तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सी.टी. मशीन्सद्वारे तपासणी केली आहे ते नमूद करणे बंधनकारक असेल. या तपासणीमध्ये किरणोत्सर्जनद्वारे ...

CT scan investigations with corona obstruction will increase | कोरोना बाधितांससह सिटी स्कॅन तपासण्या वाढणार

कोरोना बाधितांससह सिटी स्कॅन तपासण्या वाढणार

एचआरसीटी चेस्ट तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सी.टी. मशीन्सद्वारे तपासणी केली आहे ते नमूद करणे बंधनकारक असेल. या तपासणीमध्ये किरणोत्सर्जनद्वारे तपासणी असल्याने जोखीम असते, यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही तपासणी करू नये. आयआरसीटी-चेस्ट तपासणी करणाऱ्या रेडिओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे आवश्यक राहील. ज्या रूग्णांकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखाद्या रूग्णालयाने किंवा कार्पोरेट वा खाजगी आस्थापनेने जर एचआरसीटी तपासणी केद्राशी सामंजस्य करार केलेला असेल त्यासाठी उपरोक्त दर लागू राहणार नाहीत.

बाॅक्स

अधिक दर आकारल्यास कारवाई होणार

सर्व रूग्णालये, तपासणी केंद्रे यांनी एचआरसीटी- चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेले दर (मशीनच्या

प्रकारानुसार) दर्शनी भागात लावणे तसेच, निश्चित दरानुसार दर आकारणी करण्याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील.

तपासणीसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितावर कारवाई करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त हे कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यास सक्षम प्राधिकारी राहतील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

बाॅक्स

असे आकारता येणार दर

एचआरसीटी चेस्ट तपासणीकरिता मशीनच्या क्षमतेनुसार निश्चित केलेले दर कंसात दर्शविल्याप्रमाणे आहेत. 16 स्लाईसपेक्षा कमीसाठी दोन हजार रुपये, मल्टी डिटेक्टर सिटी 16-64 स्लाईस करिता रूपये दोन हजार पाचशे, मल्टी डिटेक्टर सिटी 64 स्लाईसपेक्षा जास्त करिता रूपये तीन हजार दर निश्चित करण्यात आले आहेत. उपरोक्त कमाल रकमेत सी.टी.स्कॅन तपासणी अहवाल, सीटी फिल्म, पी.पी.ई. किट, डिसइन्फेक्टंट सॅनिटायझेशन चार्जेस व जी.एस.टी. या सर्वांचा समावेश असेल.

Web Title: CT scan investigations with corona obstruction will increase