लवकरच जिल्हा रूग्णालयात सीटी स्कॅन
By Admin | Updated: February 21, 2017 00:30 IST2017-02-21T00:30:50+5:302017-02-21T00:30:50+5:30
जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने स्थानिक जिल्हा सामान्?य रूग्णालयासाठी ...

लवकरच जिल्हा रूग्णालयात सीटी स्कॅन
सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : २ कोटी २० लाखांची खरेदी
चंद्रपूर : जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने स्थानिक जिल्हा सामान्?य रूग्णालयासाठी २ कोटी २० लाख रुपये किंमतीची सी. टी. स्कॅन मशीन खरेदी करण्यात आली आहे. या सी. टी. स्कॅन मशीनचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच स्त्री रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची सी. टी. स्कॅन मशीन अभावी होणारी गैरसोय लक्षात घेता पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी सी. टी. स्कॅन मशीन खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजुरी दिली केली आहे. या मशीनसाठी स्वतंत्र खोली बांधकाम व आवश्यक सोईसुविधांसाठी २३ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हयातील रूग्णांसह शेजारच्या गडचिरोली व यवतमाळ जिल्हयातील रूग्ण सुध्दा मोठया संख्येने येत असतात. तेथे सी. टी. स्?कॅन मशीन बंद असल्यामुळे रूग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून त्यांना सी. टी. स्कॅनसाठी खाजगी रूग्णालयात जावे लागते. त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तो रुग्णालयात मशीन सुरू झाल्यानंतर दूर होणार आहे. (प्रतिनिधी)