दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:14 AM2019-10-08T00:14:37+5:302019-10-08T00:15:12+5:30

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसºयाच्या मुहूर्तावर ग्राहकांच्या आगमनासाठी विविध बाजारापेठांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या दिवशी कोट्यवधीची उलाढाल होणार असून सोने-चांदी, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेसह कपडा तसेच मिठाईची दुकाने सजली आहे. दसºयाच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह असतो. या दिवशी सोन्याचे दागिने आणि चांदीच्या उपकरणांना मागणी असते. गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्याने ग्राहक सोने खरेदीसाठी येईल,

The crowds fluttered in the market at the time of Dussehra | दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत उसळली गर्दी

दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत उसळली गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देआर्थिक उलाढाल : सराफा, इलेक्ट्रॉनिक्स व ऑटोमोबाईल बाजारपेठ सजली


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसºयाच्या मुहूर्तावर ग्राहकांच्या आगमनासाठी विविध बाजारापेठांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या दिवशी कोट्यवधीची उलाढाल होणार असून सोने-चांदी, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेसह कपडा तसेच मिठाईची दुकाने सजली आहे.
दसºयाच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह असतो. या दिवशी सोन्याचे दागिने आणि चांदीच्या उपकरणांना मागणी असते. गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्याने ग्राहक सोने खरेदीसाठी येईल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे. त्यांच्या स्वागतासाठी सर्वच शोरूम आकर्षक डिझाईनच्या दागिन्यांनी सजल्या आहे. काहींनी ऑफर दाखल केल्या आहेत. आकर्षक आणि अनोखे दागिने विक्रीस ठेवण्यात आले आहेत. दसऱ्यांच्या शुभमुहूर्तावर ग्राहक उत्साहात खरेदी करतील, असा विश्वास सोने चांदी व्यापाऱ्यांना आहे. सोन्याची नाणी एक ग्रॅमपासून उपलब्ध आहे. तसेच चेन, अंगठी, हार, नेकलेस, पेंडल, कुंदन सेट, पाटल्या, बांगड्याही विविध प्रकारामध्ये उपलब्ध आहे. या शिवाय ऑटोमोबाईल शोरूममध्ये काहींनी दुचाकी आणि चारचाकी वाहन बुकींग करतात. बुकींग झालेले वाहनही दसºयाला आणणाºयांची संख्या अधिक असते.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात यंदा उत्साह आहे. सर्वच कंपन्यांनी ग्राहकांसाठी आर्थिक बचतीच्या ऑफर दाखल केल्या आहेत. यावर्षी ग्राहकांचा ऑनलाईनमध्ये एलईडी खरेदीवर जास्त भर दिसून येत आहे. त्यानंतरही स्थानिक शोरूमध्ये ग्राहकांची गर्दी आहे. याशिवाय कपडे आणि मिठाई व्यापाऱ्यांनी विविध प्रकारच्या मिठाई तयार केल्या आहे. जिल्ह्यातील तालुकास्तरावरही बऱ्यांपैकी मार्केट असल्यामुळे तिथेही मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी बघायला मिळाली.

Web Title: The crowds fluttered in the market at the time of Dussehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dasaraदसरा