आरटीपीसीआर आणि अँटिजन तपासणीसाठी नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:29 IST2021-05-08T04:29:24+5:302021-05-08T04:29:24+5:30
त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. वैद्यकीय विभागातून सूचना देऊन प्रत्येकाने मास्क लावून रांगेत अंतर ठेवून उभे रहा, खिडकीजवळ येऊन ...

आरटीपीसीआर आणि अँटिजन तपासणीसाठी नागरिकांची गर्दी
त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे.
वैद्यकीय विभागातून सूचना देऊन प्रत्येकाने मास्क लावून रांगेत अंतर ठेवून उभे रहा, खिडकीजवळ येऊन वारंवार विचारणा करू नका, इकडे-तिकडे गर्दी करून बसू नका, वारंवार इतरत्र थुंकू नका. ज्यांना जास्त ताप, सर्दी, खोकला असेल त्यांना प्रथम घेण्यात येईल, जे शासकीय कर्मचारी आहेत, त्यांना बंधनकारक असल्याने आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे. तुम्हाला वेळ देऊन ती करण्यात येईल, ज्यांना बाहेर प्रवास करायचा असेल त्याचीसुद्धा चाचणी करण्यात येईल. मात्र येथे गर्दी करून इतरांना वा तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होईल याची काळजी घ्या. शिस्तीचे पालन करा, अशा सूचना आरोग्य अधिकारी डॉ. मनीष सिंग यांनी आपल्या स्टाफ कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. असे असतानाही रुग्णांची गर्दी मात्र कमी होत नाही. अशीच जर गर्दी वाढत राहिली तर कोरोना संक्रमणाची लाट वाढतच राहील, अशी भावना जनसामन्यांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे कोविड चाचणी केंद्र आणखी वाढवावेत, अशी मागणी आहे.