ऑफलाईन नामाकंन दाखल करण्यासाठी गर्दीने गजबजली तहसील कार्यालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST2020-12-31T04:28:32+5:302020-12-31T04:28:32+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना प्रत्यक्ष उतरता येत नसले तरी स्थानिक पुढाऱ्यांमार्फत राजकीय पक्ष खिंड लढविण्यासाठी सरसावले आहे. अनेकांनी या ...

ऑफलाईन नामाकंन दाखल करण्यासाठी गर्दीने गजबजली तहसील कार्यालये
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना प्रत्यक्ष उतरता येत नसले तरी स्थानिक पुढाऱ्यांमार्फत राजकीय पक्ष खिंड लढविण्यासाठी सरसावले आहे. अनेकांनी या माध्यमातून उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाच्या नेत्यांकडे साकडेदेखील घातले. गेल्या आठ दिवसापासून निवडणूक असलेल्या गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परंतु, नामांकन अर्ज ऑनलाईन भरावयाचा असल्याने आणि सर्व्हर काम करीत नसल्याने अनेकांच्या आशेवर पाणी फेरले होते. अनेक जणांवर सर्व कागदपत्रे तयार असतानाही वंचित राहण्याची पाळी आली होती. मात्र निवडणूक आयोगापर्यंत ही बाब पोहचताच अखेरच्या दिवशी ऑफलाईन नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची संधी चालून आल्याने पुन्हा इच्छुकांचे चेहरे फुलले. आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. संधी हुकली तर पुन्हा पाच वर्षे वाट पाहावी लागेल, या धास्तीपोटी अनेकांनी सकाळपासूनच आपले नामांकन अर्ज सज्ज करून तहसील कार्यालयापुढे ठाण मांडले. ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती.