कारागृहात भाविकांची अलोट गर्दी

By Admin | Updated: November 3, 2014 23:24 IST2014-11-03T23:24:17+5:302014-11-03T23:24:17+5:30

मोहरमनिमित्त चंद्रपुरातील कारागृहाची दारे उघडली आहेत. येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असल्याने कारागृह परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

Crowd of devotees in jail | कारागृहात भाविकांची अलोट गर्दी

कारागृहात भाविकांची अलोट गर्दी

चंद्रपूर: मोहरमनिमित्त चंद्रपुरातील कारागृहाची दारे उघडली आहेत. येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असल्याने कारागृह परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
येथील जिल्हा कारागृहात पवित्र दर्गा आहे. मोहरमनिमित्त या दर्ग्याचे दर्शन घेतले जाते. यासाठी चंद्रपूर जिल्हा कारागृह व दरगाव कमेटीने पूर्ण तयारी केली आहे. हजारोच्या संख्येत भाविक कारागृह परिसरात येऊन दर्ग्याचे दर्शन घेत आहेत. येथे एक विहीर असून तिचे पाणी आरोग्यासाठी गुणकारी असल्याची भाविकांची श्रध्दा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक हे पाणी पिऊन अंगाला लावतात. यावेळी प्रसादांची दुकानेही गिरनार चौकापासून कारागृह परिसरातपर्यंत थाटली आहे. चंद्रपुरातील प्रार्थनास्थळावर रोषणाई करण्यात आली आहे.हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून या सणाकडे बघितले जाते. त्याचा प्रत्ययही येत आहेत. सोमवारी येथील दर्ग्यावर भाविकांनी एकच गर्दी केली होती. तर मंगळवारीही मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावणार असल्याची माहिती गरगावव कमेटी तसेच कारागृहातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
विशेष म्हणजे, येथील दर्ग्याला आंध्र प्रदेश, विदर्भातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. ऐरवी नागरिकांना कारागृहात जाण्यासाठी विविध परवानगी घ्याव्या लागते. परवानगी मागूनही अनेकवेळा ती मिळत नाही. एवढेच नाही तर तेथे जाण्याची हिम्मतही कोणी करीत नाही. मात्र मोहरमनिमित्त येथील कारागृह दोन दिवसासाठी भाविकांसाठी खुले करण्यात येते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Crowd of devotees in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.