करोडोची दारू होणार नष्ट

By Admin | Updated: July 1, 2015 01:23 IST2015-07-01T01:23:57+5:302015-07-01T01:23:57+5:30

दारूबंदीनंतर अल्पकाळात पोलीस यंत्रणेने जिल्हाभरात कारवाया करून करोडो रुपयांचा दारूसाठा जप्त केला.

Crores of alcohol will be destroyed | करोडोची दारू होणार नष्ट

करोडोची दारू होणार नष्ट

दिवस ठरला : राज्यातील पहिलीच कारवाई असल्याचा अंदाज
रुपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)
दारूबंदीनंतर अल्पकाळात पोलीस यंत्रणेने जिल्हाभरात कारवाया करून करोडो रुपयांचा दारूसाठा जप्त केला. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यातील मालखाने दारूच्या साठ्याने भरून गेले. कारवाया सुरूच आहेत. त्यामुळे जप्तीतील दारू ठेवायची कुठे, या प्रश्नाने चिंतेत असलेल्या पोलिसांना आता दिलासा मिळणार आहे. येत्या शुक्रवारी या दारूची विल्हेवाट लावण्याच्या हालचाली सुरू आहेत.
दारुबंदीची अंमलबजावणी होताच, जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाया करत पोलिसांनी १ करोडहून अधिक रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला. परंतु या जप्त दारुसाठ्याने सर्वच मुख्य ठाण्यातील मालखाने हाऊसफुल्ल झाले. त्यातच दररोज होत असलेल्या पोलिसांच्या कारवाईतील जप्त दारु ठेवायची कुठे. असा प्रश्न पोलिसांना पडला होता. विषेश म्हणजे या दारु साठ्याला काही ठिकाणी वाळवी लागली होती, तर काही ठिकाणी उंदरांनी प्लॉस्टीकच्या बॉटल कातरल्याचे प्रकारही घडले होते. त्यामुळे संबंधित परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे या विभागात काम करणाऱ्या पोलिसांना अशाच परिस्थितीत काम करावे लागत होते. मात्र आता पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. पोलीस अधीक्षक संदीप दीवाण याच्या पाठपुराव्याने हा दारूसाठा नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे करोडो रुपयांची दारू एकाच दिवशी नष्ट करण्यात येणार आहे. दारू नष्ट करण्याचा दिवसही ठरविण्यात आला असून ही दारू येत्या शुक्रवारी नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती आहे. एकाच दिवशी ईतक्या मोठ्या प्रमाणात दारु नष्ट करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच कारवाई असणार आहे.
बंदीच्या काळातल्या मागील तीन महिन्यापासुून सुरु असलेल्या पोलीस कारवाईमध्ये दोन हजार २२२ अवैध दारूविरोधी कारवाया करण्यात आल्या असून त्यात पोलिसांनी एक करोड ८१ लाख ३७ हजार २४७ रुपयांचा दारु साठा जप्त केला आहे. त्यात दोन हजार ८७३ आरोपींना तुरूंगाची हवा खावी लागली, तर ४२ करोड ९७ लाख ३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या निर्देशावरुन मी सर्वच ठाण्यातील ठाणेदारांना सुप्रीम कोर्टाच्या १५ सायटेशनमधील मुद्दा क्रमांक १९ प्रमाणे दारूची विल्हवाट १५ दिवसांत करावी. त्याचा आधार घेऊन न्यायालयाशी पत्र व्यवहार करण्यास सांगितले होते. जवळपाच सर्वच ठाणेदारांनी पत्रव्यवहार करुन दारू नष्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडून मिळवली आहे. येत्या शुक्रवारी हा दारु साठा नष्ट करण्यात येणार आहे.
- प्रभाकर टिक्कस ,
ठाणेदार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर
दारु नष्ट करायची कशी, पोलिसांपुढे मोठा पेच
इतक्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या दारुची विल्हेवाट कशी करायची, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यात अद्यापही चर्चा सुरुच आहे. ही दारु नष्ट करताना पर्यावरणाला काही धोका निर्माण होणार नाही, याचीही काळजी पोलिसांना घ्यावी लागणार आहे. मोठा खड्डा करुन त्यात ही दारु ओतून नष्ट करण्यात येऊ शकते का, यावर वरिष्ठांमध्ये चर्चा सुरु आहे.
कारवाईदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
पोलीस ठाण्यात जमा असलेली जप्तीतील दारू अगोदर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात एकत्र केली जाणार आहे. तेथून विल्हेवाट लाण्यासाठी नियोजित स्थळी नेली जाणार आहे. या कारवाईदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही उपस्थित राहतील.

Web Title: Crores of alcohol will be destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.