जिल्हा बँकेकडून १३ कोटींचे पीक कर्ज वाटप
By Admin | Updated: June 22, 2015 01:06 IST2015-06-22T01:06:52+5:302015-06-22T01:06:52+5:30
नागभीड तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांमार्फत १३ कोटी ३७ लाख ५५ हजार रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले.

जिल्हा बँकेकडून १३ कोटींचे पीक कर्ज वाटप
नागभीड: नागभीड तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांमार्फत १३ कोटी ३७ लाख ५५ हजार रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. आदिवासी आणि सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून या कर्जाचे वितरण करण्यात आल्याची माहिती बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चार शाखा आहेत. यात नागभीड, तळोधी (बाळा), पाहर्णी आणि नवेगाव पांडव या शाखांचा समावेश आहे. नागभीड शाखेत १२ संस्था, तळोधी, शाखेत १२ नवेगाव पांडव शाखेत आठ आणि पाहार्णी शाखेत सहा संस्थांचा समावेश आहे. या सर्व ३८ संस्थाचे ४५२३ सभासद आहेत. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेवून मे महिन्यातच पीक कर्ज वितरणाला सुरुवात करण्यात आली. कोणीही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये याची काळजी घेण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)