वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST2020-12-31T04:28:49+5:302020-12-31T04:28:49+5:30
तालुक्यातील जंगलव्याप्त भाग मोठा आहे. जंगलाला लागूनच अनेकांची शेती आहे. मात्र काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांनी शेतात हैदोस घातला आहे. पिकांचे ...

वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान
तालुक्यातील जंगलव्याप्त भाग मोठा आहे. जंगलाला लागूनच अनेकांची शेती आहे. मात्र काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांनी शेतात हैदोस घातला आहे. पिकांचे मोठे नुकसान वन्यप्राणी करीत आहेत. त्याचा फटका बसत आहे. वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे शेतात जागली करणेही कठीण होत चालले आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस आहे. त्यामुळे रब्बीतील कोवळे पिके खाण्यासाठी प्राणी येत आहे. खरीप हातून गेला आता रब्बीचेही नुकसान होत असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.
--
नववर्षाचे स्वागत कुटुंबासह करा
परिवार बचाव संघटनेटनेचे आवाहन
चंद्रपूर : ३१ डिसेंबर हा या वर्षाला गुडबाय करून नवीन वर्षाचे हषोल्हासात स्वागत करण्याचा दिवस. हा दिवस परिवार एकता दिन म्हणूनही साजरा केला जातो. यानिमित्ताने नवीन वर्षांचे कुटुंबासोबत हसत खेळत स्वागत करा, असे आवाहन भारतीय परिवार बचाव संघटनेने केले आहे.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीने लोक आनंदात राहायचे. मात्र आता हम दो हमारे दोन अशा पद्धतीने कुटुंब व्यवस्था समोर येत आहे. भारतीय संस्कृतिमध्ये सांगितलेले एकत्र कुटुंबाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे. परिवारातील व्यक्तीसोबत एकत्र येऊन नवीन वर्षाचे स्वागत केल्यास जे मानसिक समाधान मिळते, त्याचे मोल जगातील कुठलीही गोष्ट देवू शकत नसल्याचे भारतीय परिवार बचाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष डाॅ. नंदकिशोर मैंदळकर यांनी म्हटले असून कुटुंबासोबतच नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.