कपाशीवर मावा प्रादुर्भावाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:19+5:302021-07-20T04:20:19+5:30
जिल्ह्यात लागवडीयोग्य पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात यंदा कापूस व सोयाबीन ...

कपाशीवर मावा प्रादुर्भावाचे संकट
जिल्ह्यात लागवडीयोग्य पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात यंदा कापूस व सोयाबीन लागवडीचे प्रमाण अधिक आहे. हे पीक सध्या वाढीवर आहे. एक ते दीड महिना पूर्ण झालेले पीक अचानक पिवळे पडत असल्याचे निरीक्षण कृषी विभागाने नोंदविले. जिल्ह्यात साधारण: २० टक्के पिकावर मावा प्रादुर्भाव झाल्याचे पुढे आले आहे. राजुरा, भद्रावती, वरोरा व गोंडपिपरी तालुक्यात १५ टक्के प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक फवारणी करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.
बॉक्स
१ लाख ६४ हजार ६९२ हेक्टरमध्ये कापूस लागवड
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ६४ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड झाली आहे. सोयाबीन लागवड ६० हजार हेक्टरपेक्षा जास्त झाले आहे.
सोयाबीनवर खोडमाशीने हल्ला केल्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा थांबला असून, पाने पिवळी पडतात. शेतकऱ्यांनी आतापासूनच सापळे व शिपारसींच्या कीडनाशकांचा वापर करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.