अल्पवयीन मुलीचे हात पिवळे करणाऱ्या आईसह पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST2021-06-30T04:18:51+5:302021-06-30T04:18:51+5:30
सविता अवसारे (४९), बसंती तांडे (४४) राहणार भंगाराम वाॅर्ड, विक्रम अंजीरवार (२५), अरविंद मालवीय (२७) दोघेही रा. राजापूर मध्य ...

अल्पवयीन मुलीचे हात पिवळे करणाऱ्या आईसह पाच जणांवर गुन्हा
सविता अवसारे (४९), बसंती तांडे (४४) राहणार भंगाराम वाॅर्ड, विक्रम अंजीरवार (२५), अरविंद मालवीय (२७) दोघेही रा. राजापूर मध्य प्रदेश, अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. आईने पुढाकार घेऊन मध्य प्रदेशातील राजापूर येथे आपल्याच अल्पवयीन मुलीचा विवाह २१ एप्रिलला विवाह लावून दिला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे वास्तव्यास असलेल्या मुलीच्या मोठ्या बहिणीला याचा कुणकुण लागली. तिने भद्रावती येथील आपले घर गाठून याबाबतची अधिक माहिती जाणून घेतली असता, आपल्या अल्पवयीन बहिणीचा विवाह करण्यात आल्याचे लक्षात आले. अल्पवयीन मुलीचा विवाह करणे गुन्हा असल्याने तिने थेट भद्रावती पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार सुनीलसिंग पवार यांनी विशेष पथक तयार केले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी भद्रावतीतून आरोपींना अटक केली. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.