जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST2021-04-01T04:29:28+5:302021-04-01T04:29:28+5:30
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार मंगळवारी चैतन्य कॉलनीत राहणाऱ्या आठ लोकांनी शेजारच्या महिला व तिच्या कुटुंबीयांना जमिनीच्या जुन्या वादातून ...

जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार मंगळवारी चैतन्य कॉलनीत राहणाऱ्या आठ लोकांनी शेजारच्या महिला व तिच्या कुटुंबीयांना जमिनीच्या जुन्या वादातून जातीवाचक शिवीगाळ केली, धक्काबुक्की करून मारहाण केली होती. या प्रकरणी ३० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता उशिरा सदर महिलेच्या फिर्यादीवरून माजरी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुध्द कलम १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४ व अनु. जाती/जमाती कायदा अॅट्रॉसिटी ३(२)/व्हीए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बुधवारी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजू बिंद (३४), हेमंत प्रसाद(१९), जिलेश प्रसाद(३०), मदन खैरवार(३१) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. विशेष बाब म्हणजे यात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण मध्ये महिला वर्गाचा ही समावेश असून तपास सुरू असल्याने अजून कोणाचे नाव सांगण्यात आले नाही. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे हे करीत आहेत.