शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक पितात गढूळ पाणी

By admin | Updated: May 18, 2017 01:23 IST

तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई सुरू आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील प्रकार : लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष निळकंठ नैताम । लोकमत न्यूज नेटवर्क पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई सुरू आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही या गावातील नागरिक अंधारी नदीच्या पात्रातील मलमुत्र साचलेले अशुद्ध व गढूळ पाणी पितात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकाराकडे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी व पाणी पुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. नदीच्या पात्रामध्ये परिसरातील अनेक पाळीव जनावरे पाणी पिण्यासाठी जात असतात आणि त्याठिकाणी बसतात. त्यामुळे तिथे त्यांचे मल, मुत्र साचत असते. याच ठिकाणी परिसरातील निधन झालेल्या व्यक्तींचा अंत्यविधीसुद्धा केला जातो. ते पाणीसुध्दा नदीतील पात्रात असलेल्या विहीरीमध्ये जात असते. तिथूनच ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नळाद्वारे ग्रामस्थाला पाणी पुरवठा केला जातो. नदीतील पाण्याचा प्रवाह सुरू असताना पाणी काही प्रमाणात बरे असते. परंतु नदीचे पात्र जेव्हा एप्रिल महिन्यात कोरडे होते, तेव्हा खड्डयामध्ये साचलेल्या घाण पाण्यावरच या गावातील नागरिकांना आपली तहान भागवावी लागते. नळाद्वारे पाणी येत असताना या पाण्यातून दुर्गंधी येत असते. परंतु दुसरी कुठलीच उपाययोजना नसल्याने नाईलाजास्तव स्थानिक नागरिकांना हेच पाणी प्यावे लागत आहे. हा प्रकार याठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वारंवार गावकऱ्यांनी निवेदन देऊनसुद्धा याठिकाणी अजूनपर्यंत पाण्याची कुठलीच पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. गेल्या १५ वर्षांपासून अंधारी नदीच्या पात्रावर असलेल्या विहीरीतील गाळ काढला नसून त्या विहीरीमध्ये जवळपास ८ ते १० फुट गाळ साचलेला आहे. या गावातील मजूर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सकाळी कामावर जात असतात. कामावरून आल्यावर पाण्यासाठी उन्हामध्ये दुरवरून विहीरीचे पाणी त्यांना आणावे लागते. याठिकाणी पाण्याची पातळी फार खोलवर असल्याने विहीरींनासुद्धा फारसे पाणी नाही. आपल्या सोबतच त्यांना शेतात राबणाऱ्या जनावरांनासुद्धा पाणी द्यावे लागते. स्थानिकांना इतर कामे बाजुला सारून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे पाण्यासाठी तीव्र संघर्ष करण्याची पाळी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांवर आली आहे.