वेगळ्या विदर्भासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करा

By Admin | Updated: July 24, 2016 01:10 IST2016-07-24T01:10:50+5:302016-07-24T01:10:50+5:30

वेगळ्या विदर्भासाठी खरोखरच आंदोलन चेतवायचे असेल तर विदर्भातील विद्यार्थ्यांना त्याचा केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्या स्वतंत्र विदर्भाविषयी ...

Create awareness amongst students for different Vidarbha | वेगळ्या विदर्भासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करा

वेगळ्या विदर्भासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करा

अशोक हजारे : विदर्भ राज्य आंदोलन कृती समिती स्थापन
भद्रावती : वेगळ्या विदर्भासाठी खरोखरच आंदोलन चेतवायचे असेल तर विदर्भातील विद्यार्थ्यांना त्याचा केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्या स्वतंत्र विदर्भाविषयी जनजागृती निर्माण करावी, असे परखड मत भद्रावती भाजपचे वरिष्ठ नेते अशोक हजारे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर तेलंगणाच्या निर्मितीमध्ये तेथील विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा वाटा कसा होता, ते स्पष्ट केले.
स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीसाठी वेगळ्या विदर्भाचे आंदोलन तीव्र करण्यासाठी भद्रावतीमध्ये विदर्भ राज्य आंदोलन कृति समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या स्थापन करण्यासाठी स्थानिक पातळीवरील अनेक सर्वपक्षीय नेते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात एकत्रित जमले होते.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Create awareness amongst students for different Vidarbha