वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : गाव - शहरांच्या सौंदर्यात महापुरूषांचे पुतळे आणि अनेक प्रकारचे देखणे शिल्प तयार केले जाते. या शिल्पांमुळे सौंदर्यात भर पडते. कुठेही बहुधा महापुरूषांचे वा श्रृंगारिक शिल्पच बघायला मिळतात. हल्ली जिल्ह्यात सौंदर्यीकरणात वन्य आणि पाळीव प्राणी तसेच पक्षी यांच्याच शिल्पांना महत्त्व प्राप्त झाले आहै. बल्लारपूर नगर परिषदेने मात्र शहर सौंदर्यात याला फाटा देऊन स्वच्छता कामगार, जनसामान्य तसेच वर्गीकरणपर शिल्पांना महत्त्व दिले आहे.बल्लारपूर शहराच्या मधोमध जात असलेला चंद्रपूर - कोठारी हा चौपदरी रोड या शहरातील महत्त्वाचा आणि मुख्य रोड आहे. यासोबतच कॉलरी रोडही महत्त्वाचा आहे. या दोनही रोडच्या मधोमध दुभाजक बांधले असून त्याला लोखंडी रेलींगने सुशोभित करण्यात आले आहे. त्याच्या आत विविध प्रकारची फुलझाडं लावून मोक्याच्या ठिकाणी शिल्प बसविले गेले आहेत. महत्वाचे म्हणजे, ही शिल्प इतर ठिकाणाहून हटके व लक्षणीय आहेत, हे विशेष! यात गाव स्वच्छ ठेवणारा कचरा वेचक, झाडू हातात घेऊन असलेला सफाई कामगार, हातात कचऱ्याचा घमेला घेऊन महिला स्वच्छता कर्मचारी यांची शिल्पं आहेत. एक सुंदर परी, ‘वसुंधरा जपा, कारण ती आपले रक्षण करते’, असा मोलाचा संदेश देणारे असे एकूण १२ शिल्प आहेत. या संदेश देणाºया शिल्पांसोबतच शहराच्या स्वच्छतेत अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला सफाई कामगार यांच्या शिल्पांना या सौंदर्यीकरणात देण्यात आलेले महत्त्व लक्षवेधी आहे. याबाबत न.प. चे मुख्याधिकारी विपीन मुध्दा म्हणाले, स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश लोकांपर्यंत पोहचवावा यासाठी हा उपक्रम राबविला आहे.
बल्लारपुरातील सौंदर्यीकरणात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे शिल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:22 IST
बल्लारपूर शहराच्या मधोमध जात असलेला चंद्रपूर - कोठारी हा चौपदरी रोड या शहरातील महत्त्वाचा आणि मुख्य रोड आहे. यासोबतच कॉलरी रोडही महत्त्वाचा आहे. या दोनही रोडच्या मधोमध दुभाजक बांधले असून त्याला लोखंडी रेलींगने सुशोभित करण्यात आले आहे. त्याच्या आत विविध प्रकारची फुलझाडं लावून मोक्याच्या ठिकाणी शिल्प बसविले गेले आहेत.
बल्लारपुरातील सौंदर्यीकरणात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे शिल्प
ठळक मुद्देनगर पालिकेचा अभिनव प्रयोग । पर्यावरणाचेही महत्त्व कळावे यासाठी पाऊल