महागाई विरोधात माकपचे धरणे
By Admin | Updated: August 31, 2016 00:44 IST2016-08-31T00:44:38+5:302016-08-31T00:44:38+5:30
सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे.

महागाई विरोधात माकपचे धरणे
चंद्रपूर : सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे. बड्या भांडवलदारांवर तसेच काळा बाजार करणाऱ्यांवर केंद्र तथा राज्य शासनाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यांच्याच इशाऱ्यावर हे शासन नाचत आहे. त्याच कारणाने जनविरोधी तथा कामगारविरोधी धोरण अवलंबिल्या जात आहे, अशी टीका रमेशचंद्र दहिवडे यांनी केली.
महागाईविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तथा सिटूच्या वतीने धरणे कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात आला.
केंद्र शासन होश मे आओ, बढती मंहगाईपर रोख लगाओ, सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा धिक्कार असो, नरेंद्र मोदीच्या फसवेगिरीचा धिक्कार असो आदी घोषणा देण्यात आल्या. वामन बुटले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. महागाईला आळा घाला, जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात द्या, सेवानिवृत्त अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ शासन निर्णयानुसार देण्यात यावा, धर्मल पावर स्टेशन मधील ठेका कामगारांना संरक्षन द्या, समान कामास समान वेतन देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश होता. एस.एच. बेग यांनी आभार प्रदर्शन केले. आंदोलन यशस्वी करण्याकरिता पुरुषोत्तम आदे, वामन मेश्राम, राजेश पिंजरकर, देवराव लोहकरे, शारदा लेनगुरे, संध्या खनके, वाघमारे, सुरेखा तितरे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)