चंद्रपुरातील १०० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST2021-01-17T04:24:29+5:302021-01-17T04:24:29+5:30
लसीकरणाला सुरुवात : आशा स्वयंसेविका ललिता रामटेकेंनी घेतली सर्वात प्रथम लस चंद्रपूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकार ...

चंद्रपुरातील १०० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस
लसीकरणाला सुरुवात : आशा स्वयंसेविका ललिता रामटेकेंनी घेतली सर्वात प्रथम लस
चंद्रपूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत कोविशील्ड लसीकरणाला शनिवारपासून सुरवात झाली. आशा स्वयंसेविका ललिता रामटेके या शहरातून सर्वात प्रथम लस घेणाऱ्या ठरल्या आहेत.
महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते बालाजी वाॅर्डातील टागोर शाळा केंद्रावर या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी १०० व्यक्तींना कोविशिल्ड लस देण्यात आली.
रामनगर येथील रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा येथेही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मनपातर्फे आणखी काही लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शुक्रवारी सर्वप्रथम कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच मनपातर्फे लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला होता. त्यानुसार आज प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. लसीकरण मोहिमेंतर्गत ३ हजार १६९ आरोग्य सेवेशी निगडित अधिकारी व कर्मचारी यांना प्रथम टप्प्यात लस देण्यात येणार आहे. यात मनपा आरोग्य अधिकारी - कर्मचारी, आयएमए डॉक्टर्स, पोलीस व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुढील टप्प्यात १ हजार ४२३ फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक व त्यांनतर सर्वसामान्य नागरिकांना लस दिल्या जाणार आहे. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, सभापती कल्पना बगुलकर, नगरसेवक सुरेश पचारे, पप्पू देशमुख, विशाल निंबाळकर, सीमा रामेडवार, संगीता खांडेकर, डॉ. मंगेश गुलवाडे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अाविष्कार खंडारे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. विजया खेरा, डॉ. योगेश्वरी गाडगे, नरेंद्र जनबंधू, वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.