गरजूंच्या मदतीला कोविड हेल्पिंग हॅंड्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:28 IST2021-05-13T04:28:44+5:302021-05-13T04:28:44+5:30
मागील दोन महिन्यांत चंद्रपूर जिल्हा कोरोना संकटात सापडला असून, पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा ...

गरजूंच्या मदतीला कोविड हेल्पिंग हॅंड्स
मागील दोन महिन्यांत चंद्रपूर जिल्हा कोरोना संकटात सापडला असून, पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा बाधितांना सहकार्य करण्यासाठी ॲड. फरहद बेग यांच्या नेतृत्वात कोविड हेल्पिंग हॅंड्स टीम सक्रिय झाली आहे. कोरोना पीडितांना बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजनची व्यवस्था करणे, जिल्ह्यातून आलेल्या बाधितांच्या नातेवाइकांना भोजन देणे, त्यांची राहण्याची व्यवस्था करणे, प्लाझ्माची मदत या कामासाठी ही चमू झटत आहे.
यासाठी सदस्य नाहिद हुसेन, शहेजाद सय्यद, तनशील पठाण, हकीम हुसेन, इमरान दोसानी, ॲड. अलनवाज शेख, ॲड. मनसफ अली, हबीब दाऊद मेमन, अजहर शेख, सोहेल मुस्तफा व इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.